Thursday, April 16, 2020

श्रीदत्ताची आरती व अष्टक(विसरू कसा मी गुरू पादुकाला )- Shri datta Aarti and Ashtak - Visaru kasa mi guru padukala


श्रीदत्ताची आरती व अष्टक(विसरू कसा मी गुरू पादुकाला ) Shri datta Aarti and Ashtak - Visaru kasa mi guru padukala

श्रीदत्ताची आरती, श्लोक और अष्टक   
(विसरू कसा मी गुरू पादुकाला )     

श्रीदत्ताची आरती


त्रिगुणात्मक त्रैमुर्ति दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोलवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥

       ।।   श्लोक ।। 

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु। गुरुर्देवो महेश्वराः।।
 गुरुः साक्षात्परब्रम्हः। तस्मै श्रीगुरु वे नमः।।

सदा सर्वदा योग तुझा घडावा।
तुझे कारणी देह माझा पडावा।। 
उपेक्षू नको गुणवंता अनंता।
प्रभू नायका मागणे हेचि आता।।

समर्थाच्या सेवका वक्र पाहे,
असा सर्व भूमंडळी कोण आहे।
ज्याची लिला वर्णित लोक तीन्ही
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी।।

ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे,
त्या त्या स्थळी हे निजरुप तूझे।
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी,
तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही।।

उपासनेला दृढ चालवावे
भुदेव संताशी सदा नमावे।
सत्कर्म योगे वय घालवावे
सर्वामुखी मंगल बोलवावे।।
            

              गुरुपादुका अष्टक
             
ज्या संगतीने विराग झाला।
मनोदरीचा जडभास गेला।।
साक्षातपरमात्मा मज भेटविला।
विसरू कसा मी गुरुपादुकाला।। १।।

सद्योगपंथे घरि आणियेले।
आंगेचि माते परब्रम्ह केले।।
प्रचंड तो बोध रवी उदेला।
विसरू कसा मी गुरुपादुकाला।। २।।

चराचरी व्यापकता जयाची। 
अखंड भेटी मजला तयाची।।
 परंपदी संगम पूर्ण झाला।
 विसरू कसा मी गुरुपादुकाला।। ३।।

जो सर्वदा गुप्त जनांत वागे।
प्रसन्न भक्तां निजबोध सांगे।।
सद्भक्ति भावा करिता भुकेला।
विसरू कसा मी गुरुपादुकाला।। ४।।

अनंत माझे अपराध कोटी।
नाणी मनी घालुन सर्व पोटी।।
प्रबोध करितां श्रम फार झाला।
विसरू कसा मी गुरुपादुकाला।। ५।।

काही मला सेवनही न झाले।
तथापि तेणे मज उद्धरिले।
आतां तरी अर्पिन प्राण त्याला।
विसरू कसा मी गुरुपादुकाला।। ६।।

माझा अहंभाव असे शरीरीं। 
तथापि तो सद्गुरु अंगिकारी।। 
नाही मनीं अल्प विकार झाला। 
विसरू कसा मी गुरुपादुकाला।। ७।।

आता कसा हा मी उपकार फेडू। 
हा देह ओवाळून दूर सोडूं।। 
म्यां एकभावे प्रणिपात केला। 
विसरू कसा मी गुरुपादुकाला।। ८।।

जया वर्णितां वर्णितां वेद वाणी। 
म्हणे नेति नेति तिला जे दुरूनि।। 
नव्हे अंतना पार ज्याच्या रूपाला। 
विसरू कसा मी गुरुपादुकाला।। ९।।

जो साधुचा अंकीत जीव झाला। 
त्याचा असे भार निरंजनाला।।
नारायणाचा भ्रम दूर केला।
विसरू कसा मी गुरुपादुकाला।। १०।।

         ||अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त||

1 comment:

  1. ����Shri Gurudev Datta ����

    ReplyDelete